नमस्कार मनोगतींनो;
नुकतीच marathigazal.com व्रील कार्यशाळेतुन गझलेबद्दल बरेच काही शिकायला मिळाले. मी सध्याच्या 'जमीनी' वरती लिहीण्याचा प्रयत्न करीत आहे.., जाणकारांच्या मदतीची अपेक्षा आहे...
(आत्तापर्यंत नाही नाही त्या कवितांना गझल म्हणुन लिहीले, त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.)
हुंदका साधा तुझा सांगुन गेला,
वेस मौनाची कसा लांघुन गेला।.....१
अठवणींचा रंग का गालांवरी,
ऐकतो, आसु जुना रांगुन गेला।.....२
सोडुनी साथ गेली दूर तरीही,
ना स्मृतिंचा घोळका पांगुन गेला।.....३
'दाद' गझलेला हवी, आसु नको,
'न्याय' शेर कोणता मागुन गेला।.....४
मी तयांसंगे वहातो प्रश्न सारे,
कोण वेताळां नव्या टांगुन गेला।......५
:- आनिरुद्ध