पाचोळा

वा! इथेही पाव आहे
बाटण्याला वाव आहे!

रान सरले, जपुन आता
माणसांचा गाव आहे

झापडे डोळ्यांस लावा
धाव मग भरधाव आहे!

हारलेले डाव सारे
खेळण्याचा आव आहे

हे नको तेही नको मज
ही विलक्षण हाव आहे

शुष्क पाचोळा नसे हा
वादळाचा घाव आहे

-- पुलस्ति