वणवा

वणवा

उदास होवुन
कळी म्हणाली
मरंद कोणी
टिपून गेला

उदास पाने
उदास राने
वसंत कोठे
निघून गेला?

कुठे विसावा
अता मिळावा?
पळस फुलूनी
सुकून गेला!

खुळ्या नभाची
खुळी निळाई
जळात वणवा
रुतून गेला!