(मोक्ष)

स्पर्शाने तव फाईल माझी
इष्टस्थळाला आता जाणे 
नकारघंटा नकोस बडवू
नको नाट अन् हेलपाटणे

तुला दिले मी गोड डबोले
मोक्ष मला दे मेजाखालुन
सुपंथगंगा पवित्र मंगल
अशीच वाहो युगायुगातुन....

--(खेळकर !) अदिती