संध्येचे ते श्यामल पाणी

उभा इथे मी या तीरावर

सांज माधुरी वारा चंचल

गात धावते तीच विराणी

संध्येचे ते श्यामल पाणी.

आर्त दाटले नसानसातून

गाज एकली उभ्या तनूतून

सुटले धागे गुंफ़त जाई

संध्येचे ते श्यामल पाणी.

देहधरेतून बरसत जाते

मौनमनाचे अविरत गाणे

त्या गीताच्या नयनात विसावे

संध्येचे ते श्यामल पाणी.

विकल मानस, दुखणारी नक्षी

घास आठवे तारांकित भीती

जखमेवर करते ओलीच सक्ती

संध्येचे ते श्यामल पाणी.

शुभ्र असे जे जीवन काही

जन्म साजरा मांडत जाई

वैय्यर्थ शोधते जन्माच्या पोटी

संध्येचे ते श्यामल पाणी.