(कै. शांताबाई शेळके यांची क्षमा मागून... )
-गौतम
जिवलगा चालले रे दूर कॉलेज माझे
डोके शिणले, अभ्यासाचे जड झाले ओझे...
रोज बोलती बाबा-आई
नोटस सभोवती दाटून येती
गत मित्रांची सुटली माया
टेन्शन बहु साचे...
क्लास मागचा मागे पडला
क्रिकेट ग्राऊंड तो तिमिरी बुडला
या कॅंटीनची सुटे सराई
मिटले जिमखाने...
निराधार मी, मी कॉलेज-वासी
डिग्रीविना मरेन ऊपाशी
कर मजला पास रे आता
महिमा तव गाजेल !