चारोळ्या

आसवांच गाव
कोरड बनून सज्ज होत
धरतीला सुखावण्यासाठी
धारांच्या प्रतीक्षेत होत.

पावसाच्या पाण्यामुळे
मला तुझ्यापुढे सावरता आल
डोळ्यातल्या माझ्या अश्रूला
त्याने सोबत वाहत नेल.

पावसाची पहिली सर
आठवणींना उजाळा देते
डोळ्यात त्यांना साचविण्यासाठी
अश्रूंना मोकळे करते.