मी वेगळी आहे
विमानतळावर उतरल्यावर
तशी बिचकतच मी निघाले
ऑफिसातील त्या चौकशीने
उगीच कधी जरा बावरले
उत्सुकता म्हणावी त्यांची
की चौकशी म्हणू त्याला ?
इथे तिथे नि तुमचे आमचे
अंत नव्हता विचारण्याला...
खाणे पिणे विचारून झाले
घरदार नि कपडेलत्ते झाले
जात धर्म सुद्धा सुटले नाही
मग खर वेगळे काय झाले?
मला पाहून जाता येताना
इशारे झाले... पहारे झाले..
त्यांचे कसे चांगले नेहमी
तेही मला सांगून झाले...
खर सांगू सगळे अगदी
देशातल्या सारखेच झाले..
मी तरी का मग गोठून गेले...
काय मला खोल बोचून गेले?
एक दिवस वेगळेच झाले
मार्केटात दिसताच कोणी
समवर्णीय..बालिका... इशारे
त्यांचे आमच्याकडे झाले...