क्षण...तुझे नि माझे

क्षण आपले दोघांचे

कोसळणाऱ्या पावसातले

थंडीतही ऊब देणारे

हात तुझे माझ्या हातातले

क्षण आपले दोघांचे

मुक्या मुक्या शब्दातले

माझ्या अंगी शहारा

आणि हसू तुझ्या ओठातले

क्षण आपले दोघांचे

घट्ट घट्ट मिठीतले

उरात वादळे श्वासांची

आणि निसटते शब्द कानातले

क्षण आपले दोघांचे

पहाटेच्या दवातले

दोघांचे एकच स्वप्न

इंद्रधनुषी रंगातले

काही क्षण दोघांचे

एकमेकांच्या विरहातले

दुरावा संपण्याची प्रतीक्षा

आणि मीलनाच्या ध्यासातले

               --शुभा