आणखी काही असे का?

१. आपली इच्छा नसताना ऑस्ट्रेलीया सतत का जिंकते?

२."आचरट सलमानचे" सिनेमे का चालतात?

३.  "काढलेले खड्डे हे बुजवणे आवश्यक असते" हे टेलीफोन आणि पाणी खात्याला का समजत नाही?

४."स्लीवलेस घातल्यावर आपले दंड लोंबत्या दुधी भोपळ्यासारखे दिसतात" हे असंख्य काकवांनां का समजत नाही?

५. "विमानतळावर आपले चेक इन झाल्यावर सामानाच्या ट्राली लोकांच्या पायात सोडू नयेत" हे लोकांना का समजत नाही?

६.̱ गाडीचे दार उघडून 'पाचकन' थुंकणे अत्यंत कीळसवाणे असते हे लोकांना का समजत नाही?

७‌.सिग्नल पाळले तर आपली गर्लफ़्रेंड आपल्याला भ्याड म्हणेल असे पूण्यतील रोमीओंना का वाट्ते?

८‌सिग्नलचा दिवा हिरवा दिवा लाग्ल्यावर हॉर्न वाजवला नाहीतर आपले लायसन्स जप्त होईल असे पूण्यातील वाहनचालकांना लायसन्स दिल्यावर का सांगतात?

९.कर्वे रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले तर आपलया काही पिढ्या नर्कात जातील हे मनपाच्या अधिकाऱ्यांना कोणी सांगीतले आहे?

-विटेकर