विश्वबंधुत्त्व व धर्म

विश्वामध्ये कोठलाही धर्म मग तो भूतकाळातील असो, वर्तमानातील असो अगर भविष्यातील कोठल्याही दुसऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ अगर कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक धर्म हा सापेक्ष आहे. धर्म स्थळ, काळ व समाज या ३ अक्षाशी निगडित असतो. हे ३ अक्ष वापरून कोठल्याही धर्माचे स्थान निश्चित करता येईल. या आधारे कोठल्याही धर्माचे मूल्यमापन केले तर त्या धर्मामध्ये एकही चूक सापडणार नाही. कोठल्याही अक्षात बदल केले तर चुकाच चुका सापडतील. पृथ्वीवर आद्य धर्म अरण्यधर्म असावा. या धर्मात प्रत्येक प्राणि स्वतंत्रपणे आपले भक्ष व स्वतःचे संरक्ष्ण स्वतःच करत असे. त्यामुळे ताकतवान प्राणि कमी शक्तीवान प्राण्याना सहज भक्ष बनवू शकत. (प्राणि भूक लागल्याशिवाय शिकार करत नाहीत त्यामुळे दुबळे प्राणिही टिकुन राहिले.) बोटांच्या व मुठीच्या ताकती बद्दल सर्वानाच माहिती आहे. या मुळेच दुबळे प्राणि कळप करुन राहु लागले असावेत. अरण्यधर्मातील हा पहिला बदल असावा. मनुष्यसुद्धा कित्येक प्राण्यांच्या तुलनेत दुबळाच आहे. म्हणुनच मनुष्याने कळप करुन राहण्यास लवकर सुरवात केली असेल. माणसाच्या कळपाला समाज असे संबोधले जाते.

समाजामध्ये वेगवेगळ्या शक्तीचे, कसब असणाऱ्या असणाऱ्या व्यक्ती असणारच. त्यांची शक्ती एकत्र असेल तर मोठमोठ्या शत्रूशी सामना करणे सोपे जाते. समाजामध्ये वेगवेगळ्या शक्तीचे, वेगवेगळे कसब असणाऱ्या व्यक्ती असणारच. त्यांची शक्ती एकत्र असेल तर मोठमोठ्या शत्रूशी सामना करणे सोपे जाते. सर्वांची शक्ती एकत्र राहण्याकरता समाजातील सर्व घटकामध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे. यातून ज्ञानी व्यक्तीना प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीकरता नियम बनवणे आवश्यक वाटले असावे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच नियमाना अर्थ राहील. ज्ञानी लोकानी त्या करता देव ही संकल्पना राबवली. वेळोवेळी त्या मध्ये बदल होत राहिले, नव्या संकल्पना उदयास आल्या व त्यातुनच धर्म ही संकल्पना आली. थोडक्यात समाजातील प्रत्येक घटकामध्ये बंधुभाव निर्माण करण्याकरता ज्ञानी लोकानी धर्म ही संकल्पना उपयोगात आणली.

या बद्दल थोडी जास्त माहिती हवी असेल तर येथे टिचकी मारा.