केशवसुमार व खोडसाळ यांची विडंबने आवडतात. त्यांच्यावरची ही टीका नाही. पण वाटले, या विडंबनकारांचेच केले थोडे विडंबन, तर........
ती एक टांकसाळ, तो एक खोडसाळ
दिसताक्षणी कविता, उदरी प्रचंड शूळ
ना सोडिले कुणाला, ना ठेविलेची मूळ
साहित्यमनोवनी या, हे माजलेत पोळ!
धडकी कविमनाला, कुठली लिहुन ओळ
चुकवून सांडजोडी, कुणी थांबवेल खेळ॥