(रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते)

माझी प्रेरणा प्रणव सदाशिव काळे प्रवासी यांची गझल - रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते.

रात्री जे घडले त्याची दिवसाला वार्ता नसते
रात गेली बात गेली, यातच तर गंमत असते

वरवर आताशा मी सोज्वळ असल्याचे दाखवतो
अन समजुतदारपणाने मग तीही तेव्हा फसते

ती समोर असते तेव्हा थोबाडा कुलूप असते
ती दूर जराशी होते; ही केवढी वटवट बरसते

हे कसे बोलणे? हा तर - थापांचा केवळ मारा
(लांडगा खाऊन जातो , तरी हे जग शांत बसते)

गझला लिहिण्याची किंमत कारकुना तेव्हा कळते
गझल हझल कोठे.. त्याचे  प्रत्येक विडंबन फसते

- कारकून