मी करतो ती श्रद्धा, तुम्ही करता ती अंधश्रद्धा

जयंत नारळीकरांना खरे तर अध्यात्मामधले काही कळत नसावे पण ते अधूनमधून नियमितपणे लोकांच्या श्रद्धेवर अंधश्रद्धा म्हणून प्रहार करत असतात. डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या कमी दर्जाच्या माणसांबरोबर मिसळून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली काही फालतू कार्यक्रमही करत असतात. तर असे हे नारळीकर आयुकामधे न्यूटनच्या झाडाच्या फांद्याबिंद्या मात्र न चुकता लावतात. एक झाड वठले तर अमाप पैसा खर्च करून दुसरे आणून लावायची भाषा करतात. ही त्यांची अंधश्रद्धाच नाही का?

न्यूटनचे झाड लावण्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. त्यांच्या भावना मी समजू शकतो पण 'मी करतो ती श्रद्धा, तुम्ही करता ती अंधश्रद्धा' असा भेदभाव का?

मी माझे स्पष्ट मत मांडले. पण ह्याला दोन्ही बाजू आहेत म्हणून तुमच्यासमोर हा मुद्दा चर्चेला ठेवत आहे.

- स्पष्ट वक्ता

स्पष्ट बोललो क्षमा करा. कोणाला दुखवण्याचा माझा हेतू नाही.