पहिली भेट

स्पर्श अनावर तुझे बोलले

सर्वांगी या अबोध बोली

चंद्रवेळ ही घेऊन आली

लक्ष तारकांची दिपवाली

श्वास विलसता अधरी तुझिया

रसरसली रे अवघि काया

मिठीत तुझिया विरले सखया

नकार सारे घडली किमया.........!

शीला.