काही मुक्तके


नेते उदंड होते
पक्षात बंड होते
तो राष्ट्रवाद कसला?
ते न्यूनगंड होते


सर्वत्र दूत होते
पक्के सबूत होते
हैदोस घालणारे
माझेच भूत होते


हातात हात होते
ते घातपात होते
जे व्हायचे इथे ते
आपापसात होते

- माफी