इंग्रजी शब्दांचे लफडे

मराठी लिखाणात नक्की किती टक्के इंग्रजी शब्दांचा वापर करण्याची परवानगी आहे (दहा टक्के?) याबाबत एकदा कुणीतरी श्वेतपत्रिका जारी करा बुवा! 'बॅक फूट' वर या शब्दाला एक विवक्षित संदर्भ आहे, तो तसाच्या तसा 'मागील पायावर (भार देऊन)' मध्ये कसा आणायचा यावरही एकदा कुणीतरी 'जादा वर्ग' घेऊन टाका. 'पेपर्स क्लिअर' ला एकवेळ 'कागदपत्रे बरोबर' असा प्रतिशब्द सुचवताही येईल, पण 'फिश करी' ला काय म्हणावं? माशाची आमटी? 'प्रशिक्षण' ऐवजी 'ट्रेनिंग' म्हटले म्हणून आता काय लेखकाला फटक्यांची शिक्षा ठोठावावी काय? 'पॉज' ला 'क्षणभर विसावा' म्हणून आपण भाषा सोपी करतो आहोत की अवघड? ती रिंग माझ्या डोक्यावर ठेवून ती बॅलन्स कशी करायची हे शिकवणारा युसुफ भेटला. याचे 'ते कडे माझ्या डोक्यावर ठेवून त्याचा तोल कसा साधायचा हे शिकवणारा युसुफ भेटला.' असे म्हटल्यावर साहित्यिक मूल्य वाढते काय?