बटाट्याच्या कचोर्‍या

  • उकडलेले बटाटे ४-५
  • मिरच्या ३-४
  • लसूण पाकळ्या २
  • मैदा २ वाटी
  • मीठ चवीपुरते
  • कोथिंबीर अर्धी वाटी
३० मिनिटे
२ जण(खादाड नसलेले)

१. मिरच्या, लसूण मिक्सरमधे बारीक करुन घ्यावे.
२. कोथिंबीर बारीक चिरावी.
३. उकडलेले बटाटे, कोथिंबीर, मीठ, मिरची-लसूण लगदा मळावा.
४. मैदा पोळीच्या कणकेइतका/लाटता येण्याइतका घट्ट भिजवावा. मैद्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घालावे.
५. मळलेल्या मैद्याचे छोटे गोळे करुन साधारण १० सेमी व्यासाच्या पुर्‍या लाटाव्यात.
६. पुरीच्या मध्याभागी बटाट्याचा सुपारीइतका/थोडा मोठा गोळा ठेऊन आजूबाजूच्या पुरीच्या भागाने ती पुरचुंडी नीट बंद करावी. कुठूनही बटाटा बाहेर डोकाऊ न देता.
७. आता ही तयार पुरचुंडी हलक्या हाताने अगदी थोडी लाटावी बटाटा बाहेर येऊ न देता.(म्हणजे तळायला तेलाची पातळी कमी लागेल पसरट कचोरीसाठी.) 
८. तेल तापवून खमंग गडद बदामी रंगावर तळून घ्याव्या. कचोरी तळली गेली कि फुगते. (अर्थात हे माहिती असेलच.)

गरम गरम खा. जितकी खमंग तळलेली असेल तितकी वरचे कुरकुरीत आवरण खायला मजा येते आणि मग आतल्या बटाट्याने तोंड भाजून घ्यायला.बरोबर गोडसर सांबार/ दही-दाण्याचा कूट चटणी/'सॉस भी कभी टोमॅटो था' चांगला लागतो.  

कचोरी सर्वाना माहिती आहेच. मला बटाटा आवडतो म्हणून मी नुसत्या बटाट्याची केली. नविन शोध नाही.