हे जे थोडेसे आहेत पैसे

स्सहे जे थोडेसे आहेत पैसे,

खर्च तुझ्यावर करू कैसे!

जर कुठे एक दुकान असते,

जिथे मिळती गगनातील तारे

मी सारे तारे विकत घेतले असते

तुझ्या पदरावर सजवले असते!

पण काय करू प्रिये मी?

तारे विकत नाहीत ऐसे!

जर कुठे एक दुकान असते

जिथे मिळतील सुंदर स्वप्ने

मी सगळी स्वप्ने विकत घेतली असती,

तुझ्या डोळ्यांवर ठेवली असती,

पण काय करू प्रिये मी?

स्वप्न विकत नाहीत ऐसे!