जीवनाच्या प्रवासात निघून गेले

जीवनाच्या प्रवासात

निघून गेले जे पडाव,

ते फिरून येत नसती,

ते फिरून येत नसती!

फुले फुलतात, लोक भेटतात,

शिशिरात फुले जी कोमेजली,

ती वसंतात फिरुनी बहरणार ना

काही लोक, एकदा जे दुरावले

दुसरे लाख़ो आले, परि ते भेटणार ना

उभे आयुष्य घेत राहो कोणी

त्यांचे नाव.....

ते फिरून येत नसती,

ते फिरून येत नसती!

निशा ही जाते, उषा ती येते

वेळ चालत राहते थांबत नाही

मानवाची द्रुष्टी बघू शकत नाही,

पण क्षणात ऋतू बदलून जाई

एकवार निघून गेले जे दिन आणि रात,

ते फिरून येत नसती

ते फिरून येत नसती!