कट्टी बट्टी - आठ मात्रांची छोटी गझल

दिवसा कट्टी
रात्री बट्टी

मी लुकडा, तू
धट्टीकट्टी

मला देत जा
पाणीपट्टी

तुझी सखी अन्
माझी गट्टी

ती आली अन्
जमली भट्टी

किती संशयी
तू, ती हट्टी

- माफी