अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंत्रपठण

आजच्या ई सकाळात ही बातमी वाचायला मिळाली. सर्वांना विचारांची देवाण घेवाण करणे सोयीचे जावे म्हणून ती येथे उतरवीत आहे.

ई सकाळातली मूळ बातमी : सिनेटच्या अधिवेशनास मंत्रोच्चारांनी प्रारंभ होणार

न्यूयॉर्क, ता. २७ - अमेरिकी सिनेटचे अधिवेशन येत्या १२ जुलैपासून सुरू होत असून, मंत्रोच्चारांनी त्याचा प्रारंभ होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात अशा पद्धतीने सिनेटचे अधिवेशन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. .......
"आयएएनएस' वृत्तसंस्थेने आज दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. रंजन झेद यांना मंत्रपठणासाठी बोलाविण्यात आले आहे. अमेरिकेतील दोन राज्यांच्या विधानसभांत त्यांनी नुकतेच मंत्रपठण केले आहे. ""ऋग्वेद व उपनिषदातील ऋचा आणि भगवद्‌गीतेतील काही श्‍लोक मी म्हणणार आहे. प्रार्थनेची सुरवात व शेवट ओंकाराने करणार आहे,'' असे झेद यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेत १७८९ मध्ये सिनेटची स्थापना झाली. त्यानंतर प्रथमच हिंदू प्रार्थनेने सिनेटच्या अधिवेशनाची सुरवात होणार आहे. झेद यांची पूर्ण प्रार्थना कामकाजातही नोंदविली जाणार आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक घटना ठरणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.


असे मंत्रपठण का करतात?

दरवेळी निरनिराळ्या धर्मांचे मंत्रपठण होते की कसे?

कुठल्या धर्माचे मंत्रपठण करायचे ते कसे ठरवतात?

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना ह्याची माहिती आहे काय ?

अमेरिकेत हा कार्यक्रम टीव्ही वर पाहायला मिळेल का?

भारतात लोकसभेत राज्यसभेत असे मंत्रपठण करतात का?