सात-सात-सात

नमस्काऽर मंडळी,

आजची तारीख बघितलीत का?
सात जुलै २००७, संक्षिप्त लिहिली तर ७-७-७ होते.

तर या कट्ट्यावर सात या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात.

साधारण १३ महिन्यांपूर्वी आपण असाच उपक्रम सहा-सहा-सहा या दिवसाच्या निमित्ताने केला होता.

चला मग करूया सुरुवात?