शेवटचा तांदुळ शिजला

मी थांब म्हणालो तिजला
अन माझा डोळा भिजला

पण तिने पाहिले कोठे?
डोळ्यातच अश्रू थिजला

त्या दिवसानंतर माझ्या
स्वप्नांचा डोंगर झिजला

खिजवावे काय सयींनी
हा तसाच आहे खिजला

ही का थोपटते आशा?
स्वप्नांचा बालक निजला

इच्छांच्या हवनधगीने
शेवटचा तांदुळ शिजला