हॅरी हरी

तहान नाही भुक नाही
कित्ती कित्ती वणवण
वारकऱ्याना राहवेना
सारखी त्याची आठवण

मोठ मोठ्या रांगा
केवळ त्याच्या साठी
हुरहुर मनास वाटे
हो मनी शंकांची दाटी

राहवत नाही म्हणून म्हणे
घेतली पोथी प्रत्येकास
दिवस रात्र साऱ्यांना फक्त
होता त्याचाच ध्यास

वाचला वाचला मरणातून
जणू जीव भांड्यात पडला
हॅरी पुढे हरीचा भक्त
वारकरी वेडा ठरला

सुधीर