मुलांना जर असे

आमची प्रेरणा प्रमोद बजेकरांची सुरेख गझल  फुलांना जर असे

मुलांना जर असे आहेच फेटाळायचे
कशाला रंग लावुन तोंड मग सजवायचे

कशासाठी  पसारा मांडतो तू  एवढा?
तुला आहेच जर नंतर सख्या अवरायचे

पुन्हा  भिजलोच मी , भिजलो जसा मी काल ही
विसरतो रोज मी छत्री  कशी आणायचे

विचारे सारखी येऊन झाले का तुझे
किती वेळा तिला नाही असे सांगायचे

नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
उगा लोकास अन भलतेच बघ वाटायचे

'पुन्हा भेटू 'जरी म्हटले तिने आहे मला
मला सांगा तिला आता कसे टाळायचे

सदा चाले तुझे माझे बघा माझे बघा
जरा थोबाड तू आरशास ही दावायचे

तुला बघताच "केश्या" लोक बोलू लागले
कधी मेल्या तुझे लिहिणे अता थांबायचे

                          केशवसुमार