भाव चिंतन -५

आजचे जीवन (मरण?)

आत्मा आहे अमर अन मरतो तो देह
ऐकत आलोय आम्ही युगायुगांपासून...
आज झालंय सगळंच उफराटं
आत्मा मरतोय
अन देह जगतोय, दिमाखात...

देहाला जगवा, आत्म्याला मारा
हाच आजचा जीवनाचा घोष
देहाचं जीवन आत्म्याच्या मरणात...
अन, काल ‘भूत’ झालेल्या आत्म्याच्या
`पांढऱ्या' जगण्यात...

तडफडणारा आत्मा डोकावतोय
कुठून तरी, अंधार कोपऱ्यातून
कसेबसे शब्द बापुडवाणे उच्चारत,
‘मेला आहे माणूस,
वाचवा रे त्याला कुणीतरी'...

... आज जीवनच मेले आहे!!!

-रा. वा. गुणे