शाब्दिक खोड्या

आपण भावगीतांच्या वा लोकप्रिय गाण्यांच्या ओळी गुणगुणत असता एक किंवा अनेक शब्द, गाण्याची गेयता न बिघडवता, बदलले तर अर्थाच्या काय गमती होतात त्याचे काही नमुने. (नवीन शब्द जाड अक्षरांत आहेत. गाण्यांतील मूळ शब्द देण्याची गरज नाही असे वाटते.)

१) कौसल्येचा राम भाई .........

२) घेऊनी एकतारी खातो कबीर पोहे ..........

३) स्वर आले पळुनी .........

४) स्वर गेले पळुनी / गळुनी .......... 

५) सहज सख्या एकटाच येई सांज वेळी, 
    वाट तुझी लावीन त्या आम्रतरूखाली

६) भरे मणात सुंदरा ....

७) भरे टनात सुंदरा .....

८) आसवानी गं भिजते उशी
    गं बाई चारचौघांत डिप्लोमशी

९) अजुनी बसूनी आहे
    मिळता बळी मिळेना

१०) बिल अपना और चीज परायी
     किसने ऐसी शेंडी लगायी  

बोला! काय म्हणता?