ब्रेड रोल

  • ब्रेड १ पाकिट
  • बटाटे मोठे २/३
  • आले लसूण पेस्ट २ लहान चमचे
  • धणे जीरे पावडर १ लहान चमचा
  • हिरव्या मिरच्या बारिक कापलेल्या २, कोथिम्बिर
  • चवीप्रमाणे मीठ
३० मिनिटे

बटाटे उकडून साल काढून घ्यावेत.. नीट कुस्करून त्यात मीठ , धणे जिरे पावडर , आले लसूण पेस्ट ,मिरच्या व कोथिंबीर घाला..आता नीट मळून घ्या.. ( मळताना तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या) .. आता या मिश्रणाचे लांबट गोळे करा.. ब्रेडच्या कडा काढून घ्या..एका छोट्या खोलगट डिश मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घाला...आता कडा काढलेले ब्रेडचे स्लाईस त्या पाण्यात बुडवून घ्या.. तळहातावर घेऊन अलगद दाब देऊन पाणी काढून टाका..आता तयार सारणाचा लांबट गोळा स्लाईस च्या मधोमध ठेवून रोल करून घ्या.. तेलात तळून घ्या.. सोस बरोबर छान लागतात..घरी असलेल्या जिन्नसातूनच बनत असल्यामुळे आयत्या वेळी करण्यासारखा पदार्थ आहे..

पहिल्यांदाच रेसिपी लिहिली आहे कृपया प्रतिसाद द्यावा...   

रेसिपि बूक