संत एकनाथ- साधकाची मनोवस्था

 काही दिवसा पुर्वी  शोकीन चित्रपटा वरचा लेख वाचला. कुणा वानप्रस्थाश्रमी ला अजुन्ही विषया ची इच्छा जात नसेल तरि त्यानी खालील वेराग्यपर श्लोक जरूर वाचावा. यात विषया वर नियंत्रण ठेवायाचा प्रयत्न करणार्या साधकाच्या मनात कसे युध्द चालते त्याचे सुरेख वर्णन आहे. संत एकनाथ चरणी नमस्कार करुन मनोगतीं साठी.....

त्यागावया नाहि सामर्थ्यशक्ति। त्यासी विषयभोग जेंव्हा येती॥

ते भोगी एशीयारीती । जेवी श्रुंगारीति सुळी द्यावया॥

तयासी केळे साख़र चोखटी । दुध तुप लावीता ओठि॥

शुळ भरलिया भोगापठि । तो धाक पोटि धुकधुकी॥

तेवि विषय भोगीता जाण । पुढे निरय अती दारुण॥

मज का विसरला नारायण। मधुसुदन माधव॥

मी पडलो विषय बांदिखाणी॥ वेगी पावे गरुडा वंळघोनी॥

क्रुपाळुवा चक्रपाणी। मजलागोनी सोडवी।।

विषय महाग्रहाचे तोंडि । मी सापडलो बडिशपींडी॥

गजेंद्राचे परी तातडी ।घाली उडी मजलागी॥

धावपाव  गा गोविंदा । निवारी माझी विषयबाधा।

उपेक्षु नको मुकुंदा । घेवोनी गदा धाव वेगी।

मी पडलो विषयसागरी । बुडालो काम क्रोधलहरी।

क्रोधे विसंचलो भारी। अभिमानसुरी गिळीयलो॥

तु दीनदयाळ श्रीहरी । हे आपुले बिरुद साच करि॥

मज दिनाते उद्धारी । निजबोध करी धरुनिया॥

हे विषय बाधा अति ग़हन । का पां न पावे जनार्दन ॥

येणे अट्टाहासे जाण। करी स्मरण हरिचे।

न सुटे विषय वज्रमिठि । पडलो काम द्रुश्टांचिये पोटि।

काही केलीया न सुटे मीठी । आता जगजेठी धाव वेगी॥

संत एकनाथ