जन्माला आल्याआल्याच
तोडुन टाकतात नाळ
मग आपण ती शोधत बसतो जन्मभर ...
समोर असतात अस्ताव्यस्त
अंदाधुंद, काळेपांढरे, लोकच लोक
त्यांच्यामधलेच होण्यासाठी
त्यांच्यात घुसल्यावर
आपणही होतो
अस्ताव्यस्त अंदाधुंद, काळेपांढरे
लोकल ...
सगळ्यांच्या नाळा एकमेकांशी जोडल्यावर
एकमेकात गुंतुन त्यांची तयार होते
एक घट्ट विण
सोशल फॅब्रिक ...
आणि मग आम्ही
एकमेकांच्या जवळ न येता
एकमेकांपासुन लांब न जाता
एकमेकांभोवती फिरत रहातो
वारंवार रटाळपणे
सोशल सर्कल ...
एकादा अचानक निघुन जातो
आपली नाळ मागे ठेवुन
मग आम्ही ती कुरतडत रहातो
हेरिटेज ...
इतकं करुनही नाळ सापडत नाही
कोणितरी सांगुन जातं
स्वतःमधेच आहे, तिथेच बघ.
सापडत नाही तरिसुद्धा
डोळ्यात पाणि आणुन मोठे म्हणतात
जन्माआधिच बसला होता
फास तिचा तुला
तेव्हाच कापुन टाकली डॉक्टरांन्नी ...