आर्यन ( धूम-२ )

मदनराज कोण हा, ही कैसी मोहिनी ॥ध्रु.॥

स्मरते ती रात एक

जादुई ती द्रुष्टभेट

आजवरि विरली ना जिची मोहिनी ॥१॥

आग फेकित मंचावर

झळकत तो येई वीर

कामुकसे विभ्रम करी मंद हासुनी ॥२॥

मादकशा नज़रेतुन

मिश्किलसे करित भाव

शृंगार रसपूर्ण गाइ रागिणी ॥३॥

चपल मुद्रा, सुबक थाट

बिजलीचा लखलखाट

वा नर्तन करी कामदेव धुंद होऊनी ॥४॥

तालाच्या ठेक्यावर

हृदयाचा होई नाद

मोहक त्या रुपाची चढे मोदिनी ॥५॥

रोम रोम होइ दंग

झोक घेई अंग अंग

जशी पुंगीच्या नादावर डुलत नागिणी ॥६॥

स्वप्नांचा रंगे विलास

ताऱ्यांच्या मंचकात

मदनाचा चंद्र तो, मी रती रोहिणी ।७॥

( प्रेरणा:  धूम-२ ह्या चित्रपटातील आर्यन ही व्यक्तीरेखा )