एका तळ्यात होती...........एक प्रश्न

"एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख---ऱ्होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक "

ही महाकवी ग. दि. माडगूळकरांची गाजलेली कविता (गीत आहे). या गीताबाबत मला एक प्रश्न पडला आहे. कवीने वर्णन केलेले कुरूप आणि वेडे पिल्लू हे "राजहंस" असल्याचे निष्पन्न झाले. राजहंस कुरूप किंवा वेडा कसा असू शकतो ? राजहंसाला तो राजहंस असल्याचे माहित नसेल पण कवीला तर ते माहित असायला काहीच हरकत नव्हती. राजहंस मुळात असतो का आणि असल्यास तो बदकापेक्षा सुंदर असतो का? सुंदर आणि कुरूप ह्या कल्पना मानवाप्रमाणे पशुपक्ष्यातही असतात का ? बदकांनी, भावंडांनी, लोकांनी सुद्धा राजहंसाला ओळखले नाही, हे कसे ?