गीता-षट्पदी

किती दीस गेले,गेल्या कितीक हो रात्री।
घडी घडी येई मना, तन क्षणांचे सोबती॥
मुखें पुण्य स्मरले तरिही पापें काया विटाळली।
उभे जिणे सरले तेव्हा पस्तावून काजळली॥
ईशाच्याच नावासंगे भोग-सुखे ती गिळली।
समाधीची वेळ येता, नाहीच ती सुटली गळली॥
आपल्याच तोंडाने हो, केली किती आत्मप्रौढी।
अति भार सोसवेना, कोसळली उंच शिडी॥
दुखावले किती जीवां, केला कसा अत्याचार।
दुष्टपणा आकळता हो मनीं उडे हाहाकार॥
उपरती व्हावयाला, यावा का हो अंतकाळ।
माधवोपदेश जन्मीं आचरावा वेळोवेळ॥

रचनाकाल:  ११ जानेवारी,१९९४.