जगायचेच राहुन गेले ..

आज कळले माझे जगायचेच राहुन गेले...
लहान पणी घेतला तरुणाईचा ध्यास.
तरुणपणी लागली स्वकर्तुत्वाची आस
प्रौढपण वार्धक्याच्या काळजीत निघुन गेले आज कळले माझे जगायचेच राहुन गेले...

ना कधी वाहिलो वाऱ्यासारखा. ना खळाललो कधी झऱ्यासारखा

ना झालो गंधावणारे फ़ुल मी, ना कधी उफ़ाळणारे प्रेम मी
स्वप्नेच ही सगळी.. पण ती पहाणे ही राहुन गेले
आज कळले माझे जगायचेच राहुन गेले...