शर्यत

मला आलेल्या forwarded mail चा भावानुवाद:

Ready Steady Bang च्या आवाजा बरोबर सगळ्या मुली धावायला लागल्या.फक्त १५ पाउले धावल्या असतील तेवढ्यात त्यांच्यापैकी एक लहान मुलगी पडली. तिला बरेच खरचटलं आणि ती रडायला लागली. बाकीच्या सात जणींनी तिचा रडका आवाज ऐकला. सगळ्या धावायच्या थांबल्या फक्त क्षणभरच. परत सगळ्या धावल्या पण त्या शर्यत जिंकायला नव्हे तर त्यांच्या छोट्या मैत्रिणी कडे. त्यातील एकीने तिला जवळ घेतलं थोडं थोपटलं आणि म्हणाली, आता तुझा बाऊ पळून जाईल. सातही मुलींनी त्यांच्या छोट्या मैत्रिणीला उभं केलं. दोघींनी तिला नीट धरून ठेवलं. सगळ्या जणी हातात हात घालून चालायला लागल्या. आणि सगळ्यांनी ती शर्यत जिंकली.
सगळा अधिकारी वर्ग स्तंभित झाला. आणि बघता बघता टाळ्यांचा कडकडाट आसमंतात भराला. कैक लोकांचे डोळे पाणावले
National institute of mental health हैद्राबाद येथील ही सत्यघटना. ह्या सगळ्या खास मुली होत्या. कोण म्हणेल त्यांना मतिमंद??? काय काय शिकवलं ह्या खास मुलीनं आपल्या?
मानवता? समानता?? की संघभावना??