पूड चटणी

  • १ वाटी हरभरा डाळ, १/२ वाटी उडदाची डाळ, १/४ वाटी तीळ,
  • १/४ वाटी खोबऱ्याचा कीस, ७-८ चिंचेची बोटकं, लिंबाएवढा गूळ,
  • भरपूर कढीलिंब, चवीनुसार लाल मिरच्या, मीठ
३० मिनिटे

दोन्ही डाळी  व तीळ वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. चिंच, कढीलिंब व लाल मिरच्या तळून घ्या. सगळे जिन्नस वेगवेगळे जाडसर वाटून घ्या व एकत्र कालवून घ्या.

ही चटणी बरेच दिवस टिकते. पाण्यात कालवून वरून फोडणी घालून ढोकळा, इडली बरोबर चांगली लागते.

आई