विडंबन

कसा नेहमी नको तिथे मी फिरायचो?
आणि नेमका नको तिथे मी शिरायचो... 

उमेद विरली बनायची काज़वा कुठेशी,
उगीच बनुनी रातकिडा किरकिरायचो...

शिवी एकही कधी कुणी मज दिली नसे,
इतक्या कविता इथे बसुन मी चिरायचो...

प्रतिभा माझी फसफसल्या ग्लासांमधुनी
जिरली, की मी घुटक्यांमध्ये जिरायचो...

'सुमार' नाही, आहे 'कुमार'वादी मी
(विडंबने पाडता कुणी भिरभिरायचो...)

विनंती :

१. हे कोणत्या विडंबनाचे विडंबन आहे ते ओळखा
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )
४. फक्त विडंबन ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करू नका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र विडंबन ओळखणे अनिवार्य आहे )