अखेरचे मागणे

झुकव डोके, खाली मान

आणि सावर, स्वतःचे भान ||

इंद्रधनुष्य आपले नव्हे

करडे दु:ख आपल्या सवे ||

फाकव ओठ, डोळे पूस

फिरव पाठ, बदल कूस ||

भुते झोपली राहूं देत

गोष्ट संपून जाऊं देत ||