मूग भजे

  • मूग -१ कप
  • हिरवी मिरची -२
  • जीरे - १ चमचा
  • हिंग
  • कोथिंबीर
  • लसूण -४-५ पाकळ्या
  • तेल
  • हळद, मीठ
१५ मिनिटे

  1. डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी.
  2. नंतर डाळ वाटून घ्यावी.
  3. वाटलेल्या डाळीत जीरे, हिंग, लसून- हिरवी मिरची बरीक वाटून, कोथिंबीर बारीक चिरून, हळद, मीठ टाकावे.
  4. कढईत तेल गरम करून छोटे छोटे भजे लालसर रंगावर तळावेत.
  5. कढईतून काढल्यावर पेपर नॅपकीन वर ठेवावे
  1. भजे चिंचेच्या गोड चटणी सोबत किंवा पुदीन्याच्या चटणीसोबत द्यावे.
  2. वेळ कमी असल्यास गरम पाण्यात डाळ भिजवावी २ तासात भिजते.
माझी आई