आठवणी

भुतकाळात पाऊले नेतात आठवणी

उगाच पाठलाग करतात आठवणी

मनोमनी प्रतिध्वनी गुंजतात आठवणी

चेहऱ्यावर स्मित आणतात आठवणी

काळजात कळ आणतात आठवणी

अश्रुंचे मोती सांडतात आठवणी

ऐकटेपणात साथ देतात आठवणी

काळजाच्या कुपीत जपतात आठवणी