माझ्या प्रेम कहाण्या भाग एक

बआधीच सांगतो माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या झाल्या असल्या तरी माझं ठरवूनच लग्न झाल आहे. माझ्या प्रेमकहाण्यांची सुरुवात चवथी पासून झाली म्हणजे माझ्या बऱ्याच प्रेमकहाण्या एकतर्फी झाल्या आहेत पण मी आपला हेका म्हणून काही सोडला नाही आहे पण आता लग्न झाल्या मुळे बऱ्याच गोष्टीवर बंधन आली आहेत असो तर माझ पहीलं प्रेम हे चवथीमध्ये झालं

एक गवळी नावाची मुलगी होती छान दिसायची पांढरा शुभ्र फ्रॉक घालून यायची खूप हुशार होती त्यामुळे कदाचित वास द्यायची नाही ह्यांमुळेच कदाचित पुढे काही जाऊ शकले नाही मग आमच्या शाळेत मुलं मुली एकत्र बसण्याची पद्धत निघाली तेव्हा एक छान सुंदर मुलगी माझ्या शेजारी बसायला आली पण थोड्या दिवसात पुन्हा मुलं मुली वेगळे बसायला लागली आणि आमची ही प्रेमकहाणी देखील पूर्ण होऊ शकली नाही.नंतर मला पाचवी मध्ये पुन्हा प्रेम झालं ह्या वेळी एक मुलगी होती खूप हुशार आणि डांस मध्ये पण खूप पारंगत होती ती मराठी होती पण सगळे तिला ज्युली म्हणायचे तिच्या साठी मी एकदा सरांचा मार पण खाल्ला होता कारण ते शिकवत असताना मी तिच्या कडे बघत बसलो होतो असो.हे सगळं पाचवीत बरका, मग हे लहान पण संपल आणि मी थोडा मोठा झालो म्हणजे सातवीत गेलो त्या काळी QSQT लागला होता आणि प्रेमकैदी पण लागला होता मग माझा एक मित्र १०वित होता त्याच्या बहिणी वर मी प्रेम करायला लागलो त्या काळी आमच्यावर वरील चित्रपटांचा खूप इंफ्लुअन्स होता मी अंघोळी ला जाताना ति तिच्या बाल्कनीत यायची अशी ती मला आवडायला लागली. अलीकडेच समजलं तिचा डिवोर्स झालाय आणि तिला कसलीतरी ट्रीटमेंट चालू आहे असो बिचारी किती छान दिसायची अजूनही तिची ती बाल्कनीतली छबी मनातून जात नाही. मित्राच्या धाका मुळे पुढे काही होऊ शकले नाही असो

मग आम्ही थोडे अजून मोठे झालो म्हणजे आठवींत आलो मग आमच्या समोरच्या घरात साळुंखे म्हणून एक जण राहायला होते इकडे आमचं पहिलं खरं प्रेम जमलं [float=font:brinda;place:top;]ती मुलगी रोज तिच्या खिडकीत यायची आणि आम्ही दोघे एकमेकां कडे तासन तास पाहत बसायचो नंतर आमचं भांडण झाल आणि ही प्रेम कहाणी तिथेच संपली[/float] कारण ती अजून एक दोघांशी प्रेमालाप करत होती असो.

मग आम्हाला आणखी एक मुलगी सापडली ति आमच्या समोरच्या घरात राहायला आली होती. तिचं नाव खूप छान होत मौसमी गल्लीतली सगळी मुलं तिच्यावर मरायची ती हुशार होती माझा एक मित्र तिच्या बहिणी वर लाइन मारायचा मग एकदा तिने आम्हाला बोलवून खूप झापला होता मग नंतर मला तिच्या पाठी मागे लागायची हिंमतच झाली नाही असो

मग मला वरची मुलगी होती ना जिश्याची माझं भांडण झाल होत तिच्या बहिणीशी प्रेम जमल ते थोडं पुढे जाणार तेवढ्यात आमचं घरच शिफ्ट झाल आणि माझा हे प्रेम पण अधुरं राहिलं असो