माझ्या प्रेमकहाण्या भाग २

मी आता नवीन घरी आलो पण मला शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं आता मी बारावीत गेलो होतो एका लहानश्या गावांतून एका मोठ्या शहरात आलो इथे मला मायेची माणसं कमी आणि व्यवहारी माणसं जास्त भेटली इकडे मात्र मला उथळ प्रेमा पेक्षा संवेदनशील प्रेम काय असत ते समजलं आणि प्रेम ह्या विषयात माझा अनुभव मोठा झाला.

मी थर्ड इयरला असताना माझा एक मित्र एका मुलीवर लाइन मारायचा म्हणजे तसा त्याचा तिच्या मधला इंटरेस्ट फक्त मजा करण्यापुरताच होता त्याला वाटायचं आपल्या ह्या मित्राच पण सुत तिच्या बहिणीशी जमवून द्यावं किती चांगला होता माझा मित्र मी पण लगेच म्हणालो चालेल आम्ही भेटायची वेळ ठरवली बरोबर त्या वेळेस माझा मित्र त्या मुलीस घेऊन आला मी खाली मान घालून उभा होतो तसा मी लाजाळू आहे थोड्या वेळाने मी माझी मान वर नेली मी उडालोच ती मुलगी खूपच लहान होती ती मुलगी नववीत होती आणि ती सुद्धा तयार झाली होती कारण मी तसा बरा दिसायचो गोरा आणि घारा तिला बघितल्यावर मी गारच झालो एक नववीतली मुलगी माझ्यावर प्रेम करायला तयार होती इकडे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला मला तेव्हा खरं मुलींचं मन समजायला लागलं त्या निरागस असतात ही खूप जुनी गोष्ट आहे आज कालच्या मुली खूप उथळ असतात त्यांना सहवास हवा असतो तशा आजही काही मुली असतील म्हणा पण त्यांची संख्या नक्कीच कमी आहे मी माझ्या मित्राला जायला सांगितलं तिला म्हणालो तू खुपा लहान आहेस गं तू आता स्टडीज कंप्लीट कर तू इंजिनिअर्रिंग कंप्लीट केलेस की मीच तुझ्याकडे येईन ती काय समजायचा ते समजली मी काही पुन्हा तिच्याकडे गेलो नाही

त्याच्या पुढे मला आमचा इलेक्ट्रॉनिक्सच्या मॅडम शी प्रेम जाल त्यांचे डोळे माझ्या सारखेच घारे होते त्यांचा क्लास मी कधीच चुकवायचो नाही त्यांच्या प्रेमात इतरही खूप मुले पडली होती एकदा आमच्या एका मित्र पैकी एक जण त्यांना म्हणाला होता की तुम्ही काजोल सारख्या दिसता तो मुलगा नंतर मॅडमच्या जवळ पासही नंतर दिसला नव्हता असो ह्या प्रकारा मुळे माझं ते प्रेम शोलेतल्या बच्चन सारखं अधुरं राहील होत.

माझं पुढचं प्रेम हे थोड्या परिपक्व वयात झालं जेव्हा मला माझा पहिला जॉब लागला ती [float=font:brinda;place:top;]खूप छान मुलगी होती शिल्पा तिचं नाव. एक वर्ष ती बिचारी माझ्या मागे लागली होती. मला तिच्या फिलिंगच समजल्या नाहीत[/float] पण खरं प्रेम असल्या मुळे ते जे म्हणतात ना दिल में कुछ कुछ होता है तसं व्हायचं तीच्या बद्दल खूप प्रोटेक्टीव झालो होतो मेहदी हसन च्या गझल ऐकू लागलो होतो मी खूप इन्सिक्युअर होतो म्हणून पण असेल कदाचित तिच्याशी बोलताना खूप घाबरायचो ती पण आधी मला प्रतिसाद द्यायची पण नंतर काय बिनसलं माहीत नाही ती माझ्या एका मित्रा बरोबर फिरू लागली पण अजूनही ती मला आठवते तिला त्या मित्राने देखील सोडलं आज तिच लग्न झालं आहे तिला एक मुलगी पण आहे