या पळांन्ना या क्षणांन्ना बांधला गेलो कसा
न्रुत्य धमन्यांचेच माझ्या विसरुनी गेलो कसा
थाटलेला जन्म होता या उरातिल स्पंदनांवर
प्रहरांच्या रुखवती मि गुंतला गेलो कसा
याच शब्दांच्या शरिरी काव्य होते प्राण माझे
चित्रे तयांच्या शवांना मानित गेलो कसा
काळजाचा ताल होता नाद ब्रह्माचा जिवंत
टांकसाळिच्या प्रथेला बांधला गेलो कसा
आत्म होते ब्रह्म अन देह त्याला अर्पिलेला
अर्पुनी मि आत्म सजवित देह हा गेलो कसा
काय जादू या सुरेची कोरडे डोळे तरिही
प्राण अश्रुंनिच माझे भिजवुनी गेलो कसा
आरसा प्रतिबिंब माझे का जिवंत तोच आहे
स्पंदने देउन त्याला उरत मि गेलो कसा
पापण्यांची काय ताकद, पेलण्याची स्वप्न उदरी
काढुनी त्यांना निशेतून जगत मि गेलो कसा
अर्थ माझा अर्थ आहे, एवढा का अर्थ आहे
सिंदबादी या सवाला शरण मि गेलो कसा