मुनिया...

मूळ कसदार व सुपीक जमीन : दुनिया...
जमीनदार : अजबराव.

शेतमजूर / कुळवाडी  खोडसाळ यांनी निढळाच्या घामाने सिंचून उगवलेले काँग्रेस गवत वाचकांना सप्रेम अर्पण :

स्वाद वेगळा आहे की वेगळीच मुनिया?
समजत नाही गुडदा की ही नळीच मुनिया?...

नियम खरोखर किती आगळे मुनियेचे ह्या!
कुणास ताडी, कुणास देते मळीच मुनिया!...

कधी वाटते, मुनिया इतकी वाइट नाही
देते भरताराला जेव्हा जुळीच मुनिया!...

अलगद पळ मी काढू पाहत होतो तेव्हा
बांधे भाळी माझ्या मुंडावळीच मुनिया...

सभोवतीचे काटे सारे टाळतोच मी
तरी टोचते थोडीशी, बाभळीच मुनिया...

कुणाला कधी दूर लोटले नाही आम्ही
गौर असो वा असो तशी सावळीच मुनिया...

कसा करू समझौता मी सांगा मुनियेशी?
देऊ पाहत आहे आज्ञावळीच मुनिया!...

आहे मुनिया 'खोडसाळ' आवडण्याजोगी
अर्धोन्मीलित असे जणू पाकळीच मुनिया...