चित्रपटांची गमतीदार शिर्षके

आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक इंग्रजी शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे. तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:

  • थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
  • बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
  • माहेरचं मांजर
  • मांजरीचं माहेर
  • आहेर फेकला बाहेर
  • बाहेरचा आहेर
  • माहेरचा तवा
  • लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
  • जाऊबाईच्या नणंदेची सासू
  • खवळलेली सासू- चवताळलेली सून
  • चतुर कावळा - भोळी मैना
  • एका मामे-सासूची गोष्ट
  • नणंद बनवी भडंग
  • सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
  • डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
  •  माझी लेक- तुझी सून
  • माझ्या सूनेचा सासरा
  • थांब सुने केस ओढते! ( द्वंद्व कथा )

आणि एकता कपूरच्या क छाप सिरियल्स -

  • क्यों की कुत्ता भी कभी काटता था
  • कुसूम के काकी के कौवे की कसम
  • कौन किसको काटे?
  • क्या करू कमला?
  • कमला करे काम
  • कैसी कैसी कहानी!!
  • कब कैसे कौन कौन कही कही
  • कहानी कामचोर की
  • कुसूम के काकी के काका की कागज की कश्ती की कहानी
  • कसौटी कुसुम के कैची की ( एका लेडीज टेलर ची कथा )

बघा अजून तुम्हाला काही सुचतंय का !!!