(आपण...)

आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता आपण...

काव्य स्वतः कशा करावे आपण?
आयत्या जमिनी या कसावे आपण...

कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही;
विडंबन हे पाडत रहावे आपण...

लिहिणार्‍याचा कुठे का दोष असतो?
वाचकालाच दूषण द्यावे आपण...

इतरांसाठी थोडे आपण लिहितो?
मनी येईल ते खरडावे आपण...

असेल चुकले कधी कधी अपुले पण
मान्य कशाला ते करावे आपण?...

'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते
किती जगाला इथे छळावे आपण...