[:)]
मी बघितला काय,
अन तुला दिसला काय.
इथून तिथून कुठूनही
आकाशात दिसणारा तो
चंद्र एकच.
तरी..................
कधी प्रतिप्रदेचा,
कधी चतुर्थीचा,
कधी अष्टमीचा,
तर, कधी पौर्णिमेचा.
हसत हसवत खुलणारा!
कुणाचा चांदो मामा.
कुणासाठी तिचा चेहरा.
कधी यशाचा,
कधी भाकरीचा,
कधी शीतल साथी,
सुख दु:खांचा साक्षी.
तो सगळ्यांचा!!.........
आणि त्याचा?
तसं सार जगही त्याचंच!!
पण
एक दिवस.....
फक्त एक दिवस!
तो फक्त त्याचा असतो.
पूर्ण जगाकडे पाठ फिरवून,
दूर एकांतात जाऊन बसतो.
त्या दिवशी
केवल त्या दिवशी!!
तो सुर्याला भेटतो
स्वत:साठी जगतो.
आणि आपण
[अमा वस्येच्या] दिवसाला
'अवस, अवस' म्हणत
चुकचुकत बसतो.
चंद्राच्या आनंदात
उत्सव करणार्या
चांदण्यांना नजर अंदाज करतो.
स्वाती फडणीस....................१६-०२-२००८