आमची प्रेरणा चक्रपाणि यांची सुरेख कविता/गझल खर्डेघाशी
जिलबीवर जिलबीच्या राशी
जेवण झाले, अले घशाशी
भले भुकेले राहू आम्ही
खाऊ तर खाणार तुपाशी
फोडासम सुजलेले शैशव
तुलना झाली सदा फुग्याशी
जरा बुटांशी खेळुन झाले,
'टॉमी'ने केली बदमाशी!
किती पाखरे आली गेली
एखादे आलेच गळ्याशी
बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?