आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख कविता नेपथ्य
का अखेर माकड पीणाऱ्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !
चालता लुडकतो इकडे तिकडे पडतो
हे असेच नेहमी पेताड्यांचे होते
लागली वळाया नजर सारखी माझी
हे लक्षण रे थोडी चढल्याचे होते
तू चषक कशाला दिलास हातामध्ये ?
मज दिसू लागले चित्र उद्याचे होते
सोडता सुटेना मदिरा माझ्याच्याने
मज खरे प्रलोभन मदिराक्ष्यांचे होते
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
असलेच फरक तर ते पथ्याचे होते